‘या’ पक्षाकडून पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर!

0
WhatsApp Group

भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना आता थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी नांदेड, संभाजीनगर येथे भव्य जाहीर सभाही घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र केसीआर यांच्या नावाची चर्चा होत आहे.

त्यामुळे इतर पक्षातील अनेक नाराज नेते भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वाटेवर आहेत. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. 27 जून रोजी ते पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपूरचे दिवंगत माजी आमदार यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी हैदराबादला जाऊन केसीआर यांची भेट घेतली होती. त्यामुळे या दौऱ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना BRS मध्ये येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्या मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले. ( CM Post offer to Pankaja Munde )