मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
CM Arvind Kejriwal Bail: दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी त्याचा जामीन अर्ज स्वीकारला. केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. या प्रकरणात सीएम केजरीवाल यांना दुसऱ्यांदा जामीन मिळाला आहे. यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुरुंगातून बाहेर आले होते.
Delhi excise policy case | Rouse Avenue court allows the bail application of CM Arvind Kejriwal and grants bail to him on a bail bond of Rs 1 lakh
(File photo) pic.twitter.com/kAsqVTYVtu
— ANI (@ANI) June 20, 2024
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्य घोटाळ्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. एजन्सीने त्याला या प्रकरणात आरोपी बनवले आहे. सीएम केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. मुख्यमंत्र्यांच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं की, तपास यंत्रणेकडे केजरीवाल यांना दोषी ठरवण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन मंजूर केला.
#WATCH | After Rouse Avenue court granted bail to Delhi CM Arvind Kejriwal, AAP MP Sanjay Singh says, ” …Arvind Kejriwal coming out of jail at such a time is going to strengthen democracy. This is good news for the people of Delhi…ED’s statements till now were based on… pic.twitter.com/nGosyjxNlF
— ANI (@ANI) June 20, 2024
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानं आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी X वर ट्विट केले आणि लिहिले की, सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते… https://t.co/j3SUD9JLSF
— Atishi (@AtishiAAP) June 20, 2024