पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत? मग ‘हे’ उपाय नक्की करा

0
WhatsApp Group

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे मुसळधार पाऊस पडट आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर पावसाची छोटी सरदेखील पूर्ण भिजवून टाकते, चिखल आणि पाण्यामुळे कपडे वारंवार खराब होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.

  • वॉशिंग मशीन हे कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे एक सोपे माध्यम आहे. मात्र काही जणांना वॉशिंग मशीन कपडे धुतलेले आवडत नाहीत. असे असल्यास हाताने धुतलेले कपडे वाळवण्यासाठी मशीनच्या ड्रायरचा वापर करा. दोन वेळा ड्रायर मोडवर मशीन ठेवल्यामुळे कपडे पूर्णपणे कोरडे होऊ शकतात. कारण त्यामुळे कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निघून जात. त्यामुळे कपडे लवकर सुकू शकतात.
  • जाडे मीठ अथवा खडे मीठ हवामानातील आर्द्रता शोषून घेते. जर तुम्ही खिडकीत अथवा खोलीच्या कोपऱ्यांमध्ये एखाद्या वाटीत ठेवले तर त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण कोरडे राहण्यास मदत होऊ शकते.

Benefits Of Hot water: गरम पाणी पिण्याचे हे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

  • कपडे बाल्कनी अथवा ड्राय बाल्कनीमध्ये वाळत घालण्यापेक्षा कपडे सुकत घालण्याच्या स्टॅंडवर वाळत घाला आणि ते स्टॅंड फॅनखाली ठेवा. ज्यामुळे कपडे लवकर वाळतील.
  • इनरवेअर्स वॉशिंगमशीनमध्ये धुता येत नाहीत. कारण मशीनमध्ये धुतल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. ज्यामुळे असे कपडे हातानेच धुवावे लागतात. शिवाय इतर कपड्यांपेक्षा अंर्तवस्त्रे जाड असल्यामुळे ती लवकर सुकत नाहीत. यासाठी जर तुमची अंर्तवस्त्रे लवकर सुकत नसतील तर ओलसर कपड्यांना कोरडे करण्यासाठी त्यांना इस्त्री करा. ज्यामुळे तुमचे कपडे लवकर सुकतील.

पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  • पावसाळ्यात वारंवार कपडे धुवावे लागत असल्यामुळे एकाच वेळी प्रमाणापेक्षा अधिक कपडे धुवावे लागतात. ज्यामुळे ते वाळत घालण्यासाठी जास्त जागाही लागते. कपडे वाळवण्यासाठी ते हॅंगरवर अडकवा. ज्यामुळे कमी जागेत जास्त कपडे वाळत घालता येतील. शिवाय असे कपडे सुकवताना ते मोकळे राहील्यामुळे लवकर वाळतात .
  • घरात धूप घालल्यामुळे कपड्यांच्या ओलसरपणामुळे घरात येणारा कुबट वास कमी येतो. शिवाय यामुळे कपड्यांनादेखील चांगला वास येऊ शकतो. नियमित घरात धुप घातल्यामुळे तुम्हाला प्रसन्नदेखील वाटेल.