घाटकोपर रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सहभाग

WhatsApp Group

मुंबई: घाटकोपर येथे महानगरपालिका एन विभागामध्ये आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

जवाहर रोड, नीलयोग मॉल परिसर, घाटकोपर रेल्वे स्थानक (पूर्व) येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. तोरणे, मुंबई उपनगर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे, महानगरपालिका सहायक आयुक्त (एन विभाग) संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता श्री. पवार, पदनिर्देशित अधिकारी (एन विभाग) श्री. विश्वासराव, सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. सातपुते उपस्थित होते.   आयटीआय कुर्ला व गोवंडी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक या सर्वांनी  कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग नोंदविला.

यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह उपस्थित सर्व विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. आपले मुंबई शहर स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.