अनंत चतुदर्शीनिमित्त पुण्यातील मानाच्या गणपतींसह घरगुती बाप्पाचे मोठ्या जल्लोषी वातावरणात विसर्जन पार पडला. मात्रपुण्यातील सहकार नगर भागामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून या दोन गटात वाद झावा व नंतर तुंबळ हाणामारी करण्यात आली.
लाठ्या काठ्यांनी दोन गटांनी एकमेकांवर तुफान हल्ला करण्यात आला. भर रस्त्यावरच दोन गटांमध्ये काठ्यांनी हाणामारी झाल्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. यामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.