
Christmas Wishes In Marathi: नाताळ हा सण आनंद वाटण्याचा सण मानला जातो. प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून जगभरात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाताळ हा सण केवळ ख्रिश्चन समाजातच नाही तर सर्वच समुदायांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासोबतच नवीन वर्षाच्या आगमनाची तयारीही सुरू होते. ख्रिसमसच्या दिवशी लोक सांताक्लॉजला येत्या वर्षात समृद्धी आणि यशासाठी प्रार्थना करतात. या सणाबद्दल मुलांमध्ये प्रचंड उत्साह असून, त्यांना भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा आहे. ख्रिसमस ट्री आणि घराघरात घर सजवण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. अशा परिस्थितीत लोक एकमेकांचे अभिनंदन करायला विसरत नाहीत. ख्रिसमसच्या शुभ मुहूर्तावर, तुम्ही या ट्रेंडी संदेशांद्वारे तुमचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक यांना शुभेच्छा आणि शुभेच्छा पाठवू शकता.
1) नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
2) “या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”
3) ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया
4) वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
5) भेटवस्तू ची ओढ ह्या सणी आम्हाला आणि संता क्लोज ची ओढ देखील आम्हाला पण दाराशी नाही आला संता म्हणून तुम्ही तरी आता काही पाठवा, मेरी ख्रिसमस.
6) मला खूप आनंद झाला आहे की यंदाचा ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करत आहे. माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. या जगातच मला माझा आनंद नेहमी गवसला आहे आणि भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस माय स्वीट फॅमिली.
7) नाताळ ची गोष्ट एकूण सुंदरसा बोध भेटला मला, सोडा आता मागचे पुढचे विचार आणि नाताळ दिवस तरी आनंदाने जगा, मेरी ख्रिसमस.
8) या क्रिसमस च्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट करण्याचा काळ नसून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचाही सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा
9) सगळा आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे याच नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।
10) ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
11) हा नाताळ आपणां सर्वांसाठी घेऊन येवो अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…आपणां सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! #मेरी ख्रिसमस.
12) येणारा नाताळाचा सन आपल्या आयुष्यात एक नवी उम्मेद घेऊन येवो, आणि सुख शांती प्रदान करो, नाताळच्या शुभेच्छा
13) X’mas मॅजिक आहे कुटुंब एकत्र आणत आहे प्रेमाचे सामायिकरण हसू आणि बरेच आनंद ख्रिसमसच्या वेळी आपल्याला भेटण्याची आतुरता आहे.
14) नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो. ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
15) नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं मागूया साऱ्या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
16) प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
17) तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत, आणि ज्या इच्छा आपल्या मनात लपलेल्या आहेत, ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत, आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !!
18) साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात…. नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!
19) लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून संता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं ही तर एक गोष्ट आहे भावा, नाताळच्या शुभेच्छा मित्रा.
20) आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हैप्पी ख्रिसमस.
21) माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या परिवाराला क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.
22) सारे रोजचेच तरी भासे नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!
23) ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय. ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस ट्री खालीही सापडणार नाही
24) आपल्या आयुष्यातील संता क्लोज आपला बापाचं असतो फक्त ओळखण्यात उशीर होतो. आपल्याला व आपल्या परिवारास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…
Christmas 2022: ख्रिसमस म्हणजे काय? का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती