नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
WhatsApp Group

मुंबई: “भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नाताळनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान येशु ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकार, मानवकल्याणाची शिकवण दिली. दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा संदेश दिला. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यातंच मानवजातीचं कल्याण आहे, हा विचार भगवान येशु ख्रिस्तांनी जगाला दिला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होत असलेल्या नाताळच्या निमित्ताने मानवकल्याणाचा हाच विचार पुढे नेण्याचा दृढसंकल्प करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाताळनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केला आहे.