China Earthquake: भूकंपाने चीन हादरला! 111 लोकांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपात आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

WhatsApp Group

चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की चीनमधील अनेक इमारती कोसळल्या. आतापर्यंत 111 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनचे बचाव पथक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमवारी रात्री उशिरा चीनच्या गांसू-किंघाई सीमा भागात पृथ्वी अचानक थरथरू लागली. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ते घर सोडून मोकळ्या आकाशाखाली आले. भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी मोजण्यात आली असून ती खूपच तीव्र आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू गांसू प्रांताची राजधानी लॅन्झोऊपासून सुमारे 102 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जाते. रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर संतापला, अचानक घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, उत्तर-पश्चिम चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे गांसू आणि किंघाई प्रांतांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या दोन प्रांतात आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपानंतर चीन सरकारही सक्रिय झाले आहे. आरोग्य विभागासह बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे.

बचाव पथक घटनास्थळी दाखल 

गांसू प्रांतातील जिशिशान काउंटीमध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर आरोग्य विभागाने 33 रुग्णवाहिका, 173 डॉक्टर आणि इतर कर्मचारी बचाव कार्यासाठी पाठवले आहेत, तर 68 रुग्णवाहिका आणि 40 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी किंघाई प्रांतात रवाना करण्यात आले आहेत. दोन्ही प्रांतात आतापर्यंत 300 हून अधिक जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी अनेक सर्जन पाठवले आहेत. IND vs SA: दुसरा वनडे सामना दुपारी 1.30 वाजता नाही तर कधी सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…