मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नंबरवर मिस्डकॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. त्यासाठी इच्छुकांनी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर एक मिस्डकॉल द्यायचा आहे. हा मिस्डकॉल दिल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर या निधीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची एक लिंक मेसेजद्वारे प्राप्त होईल.
त्यावर क्लिक करताच हा अर्ज डाऊनलोड होईल. ज्याची प्रिंट काढून भरायचा आहे. त्यानंतर हा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे भरुन ती पोस्टाद्वारे अथवा स्कॅन करुन पीडिएफ रुपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत.