Breking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार

WhatsApp Group

मुंबई – राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं आहे. राज्यपालांनी उद्या फ्लोर टेस्टचे आदेश दिले आहेत. पण मुख्यमंत्री या फ्लोर टेस्टला सामोर जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्रीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला म्हणून मुख्यमंत्री व्यथित झाले आहेत. त्यामुळे ते फ्लोर टेस्टला सामोरे जाणार  नाहीत. त्याऐवजी ते आजच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायत सूत्रांनी दिली आहे. माझीच माणसं माझ्याविरोधात मतदान करताना पाहायचं नाहीय, असं उद्धव ठाकरे आपल्या निकटवर्तीयांसोबत चर्चा करताना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.