
मुंबई – १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसेच आता सभेपूर्वी विविध पोस्टरही शिवसेनेकडून जारी करण्यात येत आहे. आज देखील शिवसेनेकडून एक पोस्टर ट्विट करण्यात आलं आहे.
घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं म्हणत सभेला यायलाच पाहिजे, असं ट्विटमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबईयायलाच पाहिजे..!#YaylachPahije pic.twitter.com/fkvUXYoaYd
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 13, 2022
उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते की, आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असे नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.