BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाराज नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडून मातोश्रीवर राहायला गेले आहेत. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांसह मातोश्रीच्या दिशेला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडणार असल्याचं कळताच मुंबईतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईमध्ये पाऊस पडत असतानाही उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिक रस्त्यावर भगवा झेंडा घेऊन दिसत आहेत.