Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊतांच खळबळजनक ट्विट

WhatsApp Group

मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर येत आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.