प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

WhatsApp Group

मुंबई – पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे 71 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा निवासस्थानी जलजीवन मिशन आढावा बैठक झाली.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, सचिव संजीव जयस्वाल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन अभियान संचालक ह्रषिकेश यशोद तसेच पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावीत. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.