मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

WhatsApp Group

मुंबइ – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना कोरोनाच्या एन्ट्रीने आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीआहे.