Video : ‘गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा!’ भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री शिंदे

राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, हे मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून ते सातत्याने राज्याच्या काणाकोपऱ्याचा दौरा करत, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांनी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते सातत्याने जनतेच्या मदतीसाठी धावत आल्याचे अनेक वेळा दुसून आले आहे.
अशीच काहीशी घटना विलेपार्ले येथे बघायला पहायला मिळाली आहे. येथे भर रस्त्यात एका कारने अचानक पेट घेतली. हे पाहून मुख्यमंत्री शिंदे क्षणाचाही विलंब न करता, आपला ताफा थांबवत संबंधित कार मालकाच्या मदतीसाठी धावल्याचे दिसून आले.
धावत्या दुचाकीनं महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/QEncHfveqc
— Inside Marathi (@InsideMarathi) September 13, 2022
महत्त्वाचे म्हणजे कारला जेव्हा आग लागली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ताफा याच उड्डाणपुलावरुन रवाना होत होता. कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले. त्यांनी कारचालकाची विचारपूस केली. त्यांच्याशी मुख्यमंत्री बोलले. कार जळत असल्याचं पाहून मालकाला झालेलं दुःख समजून घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. कार जवळ जाऊ नका, काळजी घ्या. जीव जास्त महत्त्वाचा आहे. कार दुसरी घेता येईल, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कार चालकाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे फॉर्च्युनर कारला आग लागल्याच सांगण्यात येतं आहे. पण याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.