मुंबई – सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीमध्ये प्रवासी विमानसेवा Ratnagiri airport सुरू व्हावी यासाठी गरजेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिले आहेत. गुरुवारी झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून निश्चितपणे या विमानतळासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
रत्नागिरीचा विमानतळ हा तररक्षक दलाच्या अखात्यारीत त्यामुळे तेथे जर नियमित प्रवासी वाहतूक सुरू करायची असेल तर विस्तार करावा लागेल. त्यासाठी दोन गावांमधील ३३.८१ हेक्टचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी जागेची संयुक्त मोजणीही करण्यात आली आहे.
भूसंपादन आणि इतर कामांसाठी ७२ कोटी रुपयांची गरज असल्याची बाब महाराष्ट्र एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ही बाब बैठकीत मांडली. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी विमानतळ होणे हे कोकणच्या विकासासाठी गरजेचे आहे त्यामुळे आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीत पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील उपस्थित होते.