सातारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतापगडाच्या जतन आणि पुनर्वसन कामासाठी शासनाने दिलेल्या निधीतून सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच गडाचे काम पूर्ण होण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही याचा पुनरुच्चार केला.
यावेळी खाली येताना जागोजागी भेटलेले नागरिक आणि धारकऱ्यांसोबत फोटो काढले. तसेच स्थानिक… pic.twitter.com/leA7xZGB9V
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 28, 2024
यावेळी जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याप्रसंगी आई भवानी मातेची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
प्रतापगडावरील आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच देवीची आरती केली. त्यानंतर किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना अत्यंत विनम्रपणे अभिवादन केले. https://t.co/JxeErhmWWH pic.twitter.com/B1wQIFpy1k
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 28, 2024