CM शिंदेंच्या जीवाला धोका? आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट

WhatsApp Group

मुंबई : मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी (Threat) मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. त्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा