मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

WhatsApp Group

मुंबई : आद्य क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. त्यांच्या एकजूटीतून जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला. आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान असे अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भगवान बिरसा मुंडा यांचे विनम्र स्मरण करावेच लागेल.