Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

WhatsApp Group

राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रिकेटच्या मैदानावरही तूफान फटकेबाजी करताना पहायला मिळाले. डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी एकनाथ शिंदे यांना बॅटिंग करण्याचा मोह आवरला नाही.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेला रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहिले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बॅटिंग करत 3 बॉल जोरात टोलावले. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला तर? काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी? वाचा…

पहा व्हिडिओ