विधानभवनात मेसीची चर्चा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

WhatsApp Group

CM Eknath Shinde on lionel messi world cup final: फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेतील 3-3 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला 4-2अशा फरकाने पराभूत करत तब्बल 36 वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. 35 वर्षीय अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता. मेसीने या स्पर्धेत सात गोल केले. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात मेसी खेळणार नसल्याने त्याच्या विश्वचषकातील कारकिर्दाचा स्वप्नवत गोड शेवट झाला असं म्हणत चाहते अर्जेंटिना आणि मेसीचं कौतुक करत आहेत. असं असतानाच आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी थेट विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं कौतुक केलं आहे.

फुटबॉल विश्वचषक सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विश्वचषक स्पर्धेत लियोनेल मेस्सीने खूप चांगली कामगिरी केली. मेस्सी आता तरुणाईचा आदर्श बनला आहे. पण मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात तयार होत नाहीत. खूप जिद्द आणि चिकाटीने ते मेहनत करत असतात. आजच्या तरुणांनीही अशाच पद्धतीने आदर्श ठेवून विविध क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यश मिळवावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा