मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. अचानक झालेल्या या दोन दिग्गजांच्या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
नुकत्याच मुंबईत झालेल्या झालेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. मात्र आज या दोघांची भेट झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा असताना त्याच वेळेला ही भेट घडून आली असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
MNS प्रमुख राज ठाकरे ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुंबई में उनके आवास पर मुलाकात की। pic.twitter.com/txNNScOoUY
— ANI_HindiNews (@AHindinews) March 26, 2023