अजित पवार 6 वाजल्यापासून काम करतात, पण मी सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचं काम करतो – मुख्यमंत्री

WhatsApp Group

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही यावेळी ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात, असं सांगितलं. ते सोमवारी (12 सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेमध्ये बोलत होते.

या सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून काम करतात असं त्यांच्या ताई सांगतात. पण एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी टोला लगावला आहे.