औरंगाबाद – बिर्याणी म्हटले तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल पण, ही बातमी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणे सोडा; उलट बिर्याणी खाताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. कारण, बिर्याणी खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. असे काय झाले या तरुणासोबत? ताटातल्या याच चमचमीत बिर्याणीमुळे 25 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावल्याची चर्चा आहे. हे ऐकून खरे वाटणार नाही मात्र, औरंगाबादच्या वाळूजमध्ये अशीच एक घटना घडली आहे. सचिन नावाच्या या तरुणाने आपल्यासाठी आणि भावासाठी बिर्याणी आणली होती.
दोघा भावांनी बिर्याणीवर मनसोक्त तावही मारला. पोटभर बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांच्याही पोटात दुखू लागले. सचिनच्या पोटात जरा जास्त दुखत होते. दोघांवरही उपचारही करण्यात आले पण, मात्र सचिनची तब्येत इतकी खालावली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिर्याणीमधून विषबाधा झाली असावी असे डॉक्टरांनी सांगितले आहे.