Chhagan Bhujbal Corona : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

WhatsApp Group

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यात दुष्काळात तेरावा म्हणून कोरोनाही एका एकाचा समाचार घेत आहे. आधी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री यांना कोरोनची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची (Chhagan Bhujbal Corona) लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.