चेन्नई सुपरकिंग्जचा Chennai Super Kings कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 च्या 15 व्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. यंदाची आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएचे संपूर्ण वेळापत्रक 6 मार्च रोजी बीसीसीआयने जाहीर केले आहे. चेन्नईचा CSK पहिला सामना 26 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. चेन्नई संघाने यासाठी आता सराव सत्रही सुरू केले आहे. यादरम्यान धोनी एका नव्या लूकमध्ये दिसला आहे MS Dhoni’s new look . आयपीएल 2022 मध्ये धोनी बदललेल्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार आहे आणि धोनीची हेअरस्टाइल खूपच वेगळी आहे.
The Hi ???? we have been waiting for!???? Day 1⃣: ????#WhistlePodu #SingamsInSurat ???? pic.twitter.com/WgvSPK43Sy
— Chennai Super Kings – Mask P????du Whistle P????du! (@ChennaiIPL) March 6, 2022
धोनीचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सध्या गतविजेते आहेत. असे मानले जात होते की आयपीएल 2021 धोनीचे शेवटचे आयपीएल असेल, परंतु 2022 मध्ये तो पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 40 वर्षीय धोनीने जुलै 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.