IPL 2022: चेन्नई-कोलकाता यांच्यात रंगणार सलामीचा सामना, वाचा आकडेवारी काय सांगते

WhatsApp Group

आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात IPL 2022 शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स Chennai Super King विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी मागच्या सीजनमध्ये शानदार खेळ दाखवला होता. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ एका वेगळ्याच अंदाजात फायनलमध्ये पोहोचला होता. चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये कोलकाताला नमवून चौथ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

आता नव्या सीजनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार असून कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात बाजी कोण मारणार? हा प्रश्न आहे. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे यंदा नवीन कर्णधार आहेत. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे तर चेन्नईचे नेतृत्व रवींद्र जडेजा करणार आहे.

दोन्ही संघांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर चेन्नइ सुपर किंग्सची बाजू जड दिसत आहे. दोन्ही संघामध्ये एकूण 26 सामने झाले असून यात 17 सामने चेन्नईने तर फक्त 8 सामने केकेआरने जिंकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सला दोन्ही लीग सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. चेन्नईने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला होता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्सने दोन विकेटने गमावला होता. फायनलमध्येही चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताला 27 धावांनी पराभूत केलं होतं.


दरम्यान सलामीच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. चेन्नईने आतापर्यंत 12 उद्घाटनाचे सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्याबाजूला कोलकाताने सलामीचे 14 पैकी 10 सामने जिंकलेत. त्यामुळे आता आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहावे लागणार.

कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, वरुण सीव्ही, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, बाबा इंद्रजीत, अभिजित तोमर, सॅम बिलिंग्ज, अ‍ॅलेक्स हेल्स, आरोन फिंच, पॅट कमिन्स, नितीश राणा, शिवम मावी, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, प्रथम सिंग, रमेश कुमार, मोहम्मद नबी, अमन हकीम खान, रसिक दार, अशोक शर्मा, टीम साऊदी, उमेश यादव

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा(कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश ठेकणा, राजवर्धन हंगरगेकर, डेव्हॉन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, अ‍ॅडम मिल्न, शुभ्रांशू सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा