IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होतं आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. पण, CSK ची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. १४ कोटींचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि अष्टपैलू मोईन अली ( Moeen Ali) व्हिसा न मिळाल्यानं अजूनही मुंबईमध्ये दाखल झालेला नाही.
त्यामुळे हे दोघंही पहिल्या सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त झाला असून तो पहिल्या सामन्यामेड नव्या पार्टनरसह सलामीला उतरणार आहे.
दरम्यान, माहीच्या चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 साठी नव्या जर्सीचं आज अनावरण केलं आहे. मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आदी फ्रँचायझींपाठोपाठ CSKही आयपीएल २०२२ मध्ये नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
Unveiling with Yellove! ????
Here’s a ???? at our new threads in partnership with @TVSEurogrip! ????#TATAIPL #WhistlePodu ???? pic.twitter.com/pWioHTJ1vd— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2022
आयपीएल 2022 साठी चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ
रवींद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी रुपये), मोईन अली (8 कोटी रुपये), ऋतुराज गायकवाड (6 कोटी ), रॉबिन उथप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.4 कोटी रुपये), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (रु. 14 कोटी), केएम आसिफ (रु. 20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख), शिवम दुबे (4 कोटी), महेश ठेकणा (70 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी), डेव्हॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सँटनर (1.90 कोटी), अॅडम मिलने (1.90 कोटी), शुभ्रांशू सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी), सी हरी निशांत (20 लाख), एन जगदीसन (20 लाख), ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), के भगत वर्मा (20 लाख )