आयपीएल 2022 साठी असा आहे धोनीच्या चेन्नईचा संपूर्ण संघ!

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगच्या IPL 15 व्या हंगामातील मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने एकूण 21 खेळाडूंना खरेदी केले आहे. चेन्नईने CSK मेगा लिलावात दीपक चहरवर सर्वात मोठी बोली लावत त्याचा पुन्हा संघात समावेश केला आहे. याशिवाय चेन्नईने अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो आणि रॉबिन उथप्पा यांनाही पुन्हा संघात सामील करून घेतले आहे. मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने Chennai Super Kings कर्णधार एमएस धोनी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोईन अली आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना संघात कायम ठेवले होते.

नवीन खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलू शिवम दुबेला 4 कोटी रुपयांना खरेदी केले. याशिवाय न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेला एक कोटींमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियसला ५० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. चेन्नई टीममध्ये न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर आणि अ‍ॅडम मिल्ने यांचाही समावेश होता. याशिवाय 2022 च्या अंडर-19 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या राजवर्धन हंगरगेकरला CSK ने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने आजवर 4 वेळा विजेतपद मिळवल आहे. 2010 आणि 2011 मध्ये सलग 2 वेळा चेन्नई आयपीएलचा विजेता बनला होता. तर त्यानंतर 2018 मध्ये तिसऱ्यांदा आणि 2021 मध्ये चौथ्यादा चेन्नई विजेतेपद पटकावलं आहे. तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 200 पेक्षा अधिक सामने खेळणार धोनी हा आजवरचा एकमेव खेळाडू आहे. चेन्नईच्या संघ आजवर खेळल्या गेलेल्या प्रत्येक मोसमात धोनीच्याच नेतृत्वात खेळला आहे.

आयपीएल 2022 साठी चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ

रवींद्र जडेजा (16 कोटी)
एमएस धोनी (12 कोटी रुपये)
मोईन अली (8 कोटी रुपये)
ऋतुराज गायकवाड (6 कोटी )
रॉबिन उथप्पा (2 कोटी)
ड्वेन ब्राव्हो (4.4 कोटी रुपये)
अंबाती रायुडू (6.75 कोटी)
दीपक चहर (रु. 14 कोटी)
केएम आसिफ (रु. 20 लाख)
तुषार देशपांडे (20 लाख)
शिवम दुबे (4 कोटी)
महेश ठेकणा (70 लाख)
राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)
डेव्हॉन कॉनवे (1 कोटी)
ड्वेन प्रिटोरियस (50 लाख)
मिचेल सँटनर (1.90 कोटी)
अ‍ॅडम मिलने (1.90 कोटी)
शुभ्रांशू सेनापती (20 लाख)
मुकेश चौधरी (20 लाख)
प्रशांत सोळंकी (1.20 कोटी)
सी हरी निशांत (20 लाख)
एन जगदीसन (20 लाख)
ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी)
के भगत वर्मा (20 लाख )