IPL 2022: मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या

WhatsApp Group

आयपीएल 2022 मध्ये 59व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाज गडगडले. एमएस धोनीने एक टोक पकडले, पण संपूर्ण संघ 97 धावांत ऑलआऊट झाला. केवळ आयपीएल 2022 मध्येच नव्हे तर इतिहासातील चेन्नईची ही दुसरी छोटी धावसंख्या होती.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली होती. डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली पहिल्याच षटकात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. सुरुवातीच्या षटकात आलेला दबाव पुढच्या षटकात वाढत गेला, तेव्हा पुढच्याच षटकात रॉबिन उथप्पाही शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईच्या विकेट पडत राहिल्या, कर्णधार एमएस धोनीने नाबाद 34 धावांची खेळी केली, नाहीतर संघाला 50 धावांपर्यंत पोहोचणे कठीण वाटत होते.

आयपीएल 2013मध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एका सामन्यात फक्त 79 धावा केल्या होत्या. ही त्यांची आतापर्यंतची सर्वात लहान धावसंख्या आहे. आता या यादीत गुरुवारी खेळला गेलेला सामना दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुंबईविरुद्धच्या या सामन्यामध्ये चेन्नईचा संपूर्ण संघ अवघ्या 97 धावांवर गुंडाळला गेला.

चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएलमधील सर्वात कमी स्कोर – 79

चेन्नई – 79 सर्वबाद
विरुद्ध संघ – मुंबई इंडियन्स
तारीख – 5 मे 2013
स्टेडियम – वानखेडे स्टेडियम

चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएलमधील दुसरा सर्वात कमी स्कोर – 97

चेन्नई – 97 सर्वबाद
विरुद्ध संघ – मुंबई इंडियन्स
तारीख – 12 मे 2022
स्टेडियम – वानखेडे स्टेडियम