IPL 2024 CSK vs DC: आयपीएल 2024 च्या 13व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते, जे धोनीच्या संघाला गाठता आले नाही आणि संघाला विजय गमवावा लागला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात चांगली फलंदाजी केली असली तरी. धोनीने या सामन्यात 16 चेंडूत 37 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 3 षटकार मारले गेले. पण तरीही या पराभवासाठी माहीला जबाबदार धरले जात आहे, याचे कारण 18वे आणि 19वे षटक आहे, जेव्हा धोनीने 5 चेंडू खेळून केवळ एक धाव घेतली होती, काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
शेवटच्या 13 चेंडूत 46 धावांची गरज होती.
या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी खूप चर्चेत आहे. धोनीची फलंदाजी पाहण्याची चाहत्यांना खूप दिवसांपासून इच्छा होती, माहीने या सामन्यात चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. पण माहीने एक चूक केली, ज्यामुळे हा सामना गमावला. चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना त्यांना विजयासाठी शेवटच्या 13 चेंडूत 46 धावांची गरज होती. हे लक्ष्य तुम्हाला मोठे वाटेल, पण जेव्हा महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा स्ट्राईकवर उभे होते त्यामुळे ते साध्य होते. माहीच्या चुकीमुळेच चेन्नईचा सामना हरला, असा आरोप सोशल मीडियाचे चाहते करत आहेत.
46 needed off 13 balls.
17.6 – Dot
18.2 – Dot (Denied single to Jadeja)
18.3 – Dot (Denied single to Jadeja)
18.4 – Dot (Denied single to Jadeja)
18.5 – Single (wtf logic this)MS Dhoni scored 1 runs off 5 balls when CSK had a chance of winning. Brainless CSK fans 🤣 pic.twitter.com/GILJhck8yc
— Messi VK stan (@Im_vkolhi) March 31, 2024
धोनीने काय चूक केली?
चेन्नईला विजयासाठी 13 चेंडूत 46 धावांची गरज असताना धोनीने 13व्या चेंडूवर एकही धाव काढली नाही. यानंतर धोनीला 19व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सिंगल घेण्याची संधी होती, मात्र त्याने जडेजावर विश्वास ठेवला नाही आणि सलग 3 चेंडूंवर सिंगल घेण्यास नकार दिला. 3 चेंडूत एकही धाव न घेता धोनीने ओव्हरच्या 5व्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे धोनीने 5 चेंडूत केवळ एक धाव घेतली. इथून सामना पूर्णपणे बदलला. धोनीसमोर जडेजा होता, जो तुफानी खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. मात्र धोनी त्याला संधि देत नव्हता.
LPG Cylinder Price: खुशखबर!! गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; जाणून घ्या किती झाली किंमत…
Never ask MS Dhoni fans about 19th over.
Their entire life is Thala’s fake finishing pic.twitter.com/Uz7i3Dt5tn
— Messi VK stan (@Im_vkolhi) March 31, 2024
रवींद्र जडेजाकडे धावा काढण्याची क्षमता आहे, पण तरीही धोनीने धावा घेण्यास नकार दिला आणि चेन्नईला 13 चेंडूत 46 धावांची गरज असताना माहीने 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धाव आणि 19व्या षटकात 4 चेंडूत धावा काढल्या. याच कारणामुळे माहीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. या पराभवासाठी सोशल मीडियाचे चाहते माहीला जबाबदार धरत आहेत.
17 th Over Mukesh – 3 Balls -9 Runs (2- 4s)
18 th Over Khaleel – 3 Balls-7 Runs (1-6s)
19th Over mukesh – 4 balls – 1 Run (He didn’t Run for Singles)
20th Over Nortje – 6 Balls – 20 Runs (2 -4s and 2-6s)
Then above all bowlers are waste in your view anna @msdhoni #MSDhoni https://t.co/IhKfdLrPD9 pic.twitter.com/qtOVlULqM1
— Chandu Cherry MSD™🥛 (@MrChandu_) March 31, 2024