
आयपीएलच्या पंधराव्या IPL 2022 हंगामाील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज Mumbai vs Chennai या दोन तगड्या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात फिनिशर धोनीने MS Dhoni शेवटच्या षटकात चेन्नईला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा हा सलग सातवा पराभव आहे.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि इशान किशन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हाल्ड ब्रेव्हिस 4 धावा काढून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 21 चेंडूत 32 धावा केल्यानंतर तोही झेलबाद झाला.
आपला पहिला सामना खेळत असलेल्या हृतिक शोकीनने डाव सांभाळला आणि 25 चेंडूत 25 धावा केल्या. याशिवाय पोलार्डने 14 आणि डॅनियल सॅम्सने 5 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्माने सर्वाधिक 51 धावांची नाबाद झुंजार अर्धशतकी खेळी केली. तर जयदेव उनाडकटने 19 धावा करून त्यासा चांगली साथ दिली. राहिले. चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने सर्वाधिक 3, ड्वेन ब्राव्होने 2 आणि मिचेल सँटनर, महेश तिक्षाना यांनी 1-1 बळी घेतला.
We’ve seen him do it many times, he does it once again ????
MS DHONI, take a bow!
28 runs, 13 balls ????#MIvCSK #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 21, 2022
चेन्नई संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. डॅनियल सॅम्सने मुंबईला पहिला विकेट मिळवून दिला. त्यानंतर मिचेल सँटनरन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 9 चेंडूत 11 धावा करत झेलबाद झाला.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रॉबिन उथप्पा 25 चेंडूत 30 धावा करत झेलबाद झाला. शिवम दुबे 14 चेंडूत 13 धावा करत बाद झाला. त्यानंतर रायुडू शानदार फलंदाजी करत होता मात्र तो 35 चेंडूत 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार रवींद्र जडेजा 3 धावा करत बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. धोनीने 13 चेंडूत 28 धावा फटकवल्या. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूवर चौकार खेचत धोनीने चेन्नईला थरारक विजय मिळवून दिला.