T20 World Cup 2022: झिम्बाब्वे-नेदरलँड्स T20 विश्वचषक 2022 साठी पात्र, स्पर्धेतील सर्व 16 संघांची पहा यादी

WhatsApp Group

T20 World Cup 2022: झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सचा संघ देखील आयसीसीच्या आगामी T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. शुक्रवारी क्वालिफायर ब च्या उपांत्य फेरीत दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकले. यजमान झिम्बाब्वेने पापुआ न्यू गिनीचा 27 धावांनी पराभव केला तर नेदरलँड्सने यूएसएचा सात गडी राखून पराभव करून विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले.

क्वालिफायर A च्या उपांत्य फेरीत विजय मिळवून आयर्लंड आणि UAE आधीच विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. तर आता झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने क्वालिफायर ब ची उपांत्य फेरी जिंकून या मोठ्या लढतीत प्रवेश केला आहे.

क्वालिफायर बी मध्ये, झिम्बाब्वेला यूएसए, जर्सी आणि सिंगापूरसह गट अ मध्ये ठेवण्यात आले होते, तर नेदरलँड्स हाँगकाँग, युगांडा आणि गेल्या वर्षी विश्वचषक खेळणाऱ्या पापुआ न्यू गिनीसह ब गटात होते. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने आपापल्या गटातील सर्व सामने जिंकले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पीएनजीसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पीएनजीचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 172 धावाच करू शकला. झिम्बाब्वेकडून ब्लॅशिंग मुजारबानीने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेचा संघ त्याच्याशी टक्कर देऊ शकला नाही.

नेदरलँडच्या गोलंदाजांनी अमेरिकेच्या फलंदाजांना 19.4 षटकांत 138 धावांत गुंडाळले. यानंतर त्यांच्या फलंदाजांनी 19 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. नेदरलँडसाठी बस डी लीडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 67 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 91 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत जगभरातील 16 संघांमध्ये विजेतेपदासाठी टी-20 लढत होणार आहे. यामध्ये, आयसीसी क्रमवारीनुसार अव्वल आठ संघ (भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया) आधीच सुपर 12 टप्प्यासाठी पात्र झाले आहेत. उर्वरित चार संघांसाठी, सुपर 12 साठी पात्रता सामने एकूण आठ संघांमध्ये खेळवले जातील.

T20 विश्वचषक 2022 साठी संघ: ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड आणि झिम्बाब्वे.