सकाळी वाहिली होती दिग्गजाला श्रद्धांजली, संध्याकाळी स्व:ताचाच झाला मृत्यू; शेन वॉर्नचं शेवटचे ट्वीट पाहा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज फिरकीपट्टू शेन वॉर्न (Australia cricket Shane Warne) यांके वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे. त्यातच शेन वॉर्नने सकाळी केलेले ट्विट आता चर्चेचा विषय ठरला आहे.
Sad to hear the news that Rod Marsh has passed. He was a legend of our great game & an inspiration to so many young boys & girls. Rod cared deeply about cricket & gave so much-especially to Australia & England players. Sending lots & lots of love to Ros & the family. RIP mate❤️
— Shane Warne (@ShaneWarne) March 4, 2022
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे ट्विट केले होते. त्यांनी लिहलंय की, रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. तो क्रिकेटमधील महान खेळाडू होता आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होता. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी क्रिकेटला खूप काही दिले.
विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिले आहे. या बिकट काळात मी रॉस आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांसोबत आहे. असे शेन वॉर्नने ट्वीट केले होते.