जॅकी श्रॉफच्या पत्नीसोबत झाली फसवणूक, खात्यातून 58 लाख रुपये उडवले

0
WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांची 58 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफसोबत 58 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयशाच्या तक्रारीनुसार, अॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने तिची 58 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानंतर ती तक्रार लिहिण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 420, 408, 465, 467 आणि 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विलंब न लावता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये अॅलन यांना एमएमए मॅट्रिक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एमएमए मॅट्रिक्स ही टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा चालवणारी जिम आहे. आरोपींनी भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंटची योजना बनवली होती, असेही बोलले जात आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी कंपनीकडून मोठी रक्कमही घेतली होती. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत या स्पर्धेसाठी कंपनीच्या खात्यात 58,53,591 रुपये जमा करण्यात आले.