लुधियाना – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी Charanjit Singh Channi यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. राहुल गांधी Rahul Gandhi यांनी लुधियाना येथील काँग्रेसच्या सभेत ही घोषणा केली आहे Congress chief ministerial candidate .
या घोषणेमुळे मुख्यमंत्री पदावर सातत्याने दावा मांडणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. आता सिद्धू काय बोलतात आणि कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Charanjit Singh Channi will be the Congress’ chief ministerial candidate for the upcoming Punjab Assembly elections: Rahul Gandhi in Ludhiana pic.twitter.com/KW0aQ8wcpT
— ANI (@ANI) February 6, 2022
चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवलेला नाही. मी पंजाबच्या लोकांना विचारले. उमेदवार आणि कार्यकर्त्यांना विचारले. पंजाबने स्वत:चा नेता निवडावा, असे ते म्हणाले. मी फक्त मत देऊ शकतो पण पंजाबचे मत जास्त महत्त्वाचे आहे. पंजाब म्हटलं की आम्हाला गरीब घरचा मुख्यमंत्री हवा आहे.
पंजाबला भूक आणि गरिबी समजणाऱ्या अशा माणसाची गरज आहे. राहुल म्हणाले की, चरणजीत सिंग चन्नी हे गरीब घरातील आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यात अहंकार नव्हता. त्यामुळेच चरणजीत चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
हेही वाचा
पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!