चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, आई सरस्वती पाटील यांचं निधन

WhatsApp Group

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झालं आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत.

सरस्वती पाटील यांचं संभाजीनगर येथील घरी निधन झालं. त्यांच्या पार्थिवारवर आज रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.