मुंबई – पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर महाराष्ट्रासह, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या मध्यवर्ती भागात पूर्वेकडील वाऱ्याच्या संगम व trough in easterlies मुळे;7 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान व प. मध्य प्रदेशात गडगडाट ????/सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
???? 8 व 9 मार्च: मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता.
– IMD pic.twitter.com/XtBEXCk7vt— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 7, 2022
याशिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईमध्ये कमाल तापमानात वाढ होत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता धक्कादायक माहिती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालामधून समोर आली आहे.