
राज्यात आज मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान केंद्र मुंबईने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा या भागांना इशारा दिला आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाऊस आणि वेगवान वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विविध ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि गडगडाट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.