राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता!

WhatsApp Group

नवी दिल्ली – राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे,तर काही भागात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीचे संचालक के.एस. होसळीकर यांच्याकडून ही माहिती सांगण्यात आली आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर, अकोला या भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांत पुण्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. नाशिक, नागपूरपेक्षा पुण्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे.

वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पुढील 4 दिवस विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.