
Monsoon News : मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणातून आलेला मान्सून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आगेकूच केला. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.