No Detention Policy Abolished : शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या निर्णयावर शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता पाचवी ते आठवीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा महत्त्वाची राहणार आहे. जर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले तचर त्यांना वरच्या वर्गात ढकलले जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
नव्या शिक्षण धोरणानुसार नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.
या निर्णयामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास केलं जाणार असून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र त्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.