मुंबई मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; नवाब मालिकांनंतर आता शिवसेनाचा नेता ईडीच्या रडारवर

WhatsApp Group

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक आता शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहे. दाऊद मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना याच प्रकरणात ईडीने अटक केली आहे.

गुरुवारी नवाब मलिक यांचा भाऊ कॅप्टन मलिक यालाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. बुधवारी ईडीने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली.