नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या (Terror attacks ) घटना वाढत असून केंद्र सरकार ( Government of India ) लोकांना सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नोटाबंदी आणि कलम ३७० रद्द करुनही भाजप सरकार दहशतवादाला आळा घालण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी काश्मीरमधील (Jammu-Kashmir) दहशतवादी हल्ल्यांचा (Terror attacks ) निषेध करत शोक व्यक्त केला आहे. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांवरील या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो, असही राहुल गांधी म्हणाले.
जम्मू -काश्मीरमध्ये मृत्यूचं तांडव
श्रीनगरमधील ईदगाह (Idgah) परिसरातील एका सरकारी शाळेवर गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाळेतील मुख्याध्यापकाचा आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती
बुधवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर गोळीबार केला. बिंदरू यांना रुग्णालयात हलवण्यात आले जेथे त्यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या एका घटनेत, श्रीनगरमध्ये रस्त्यावरील फेरीवाल्यांवर हशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांना ठार केले. अजून एका घटनेत उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा (Bandipora) जिल्ह्यातील हशतवाद्यांनी मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडून त्याला ठार केले.