Marathi Language : मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय; मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

WhatsApp Group

मोदी सरकारनं सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

माझा मराठाचि बोलु कौतुके।

परि अमृतातें ही पैजा जिंके ॥

 समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस. अत्यंत अभिमानाचा क्षण !, असं ट्विट राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आह, असं केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी म्हणाले.