
वीज दरात बदल करण्यासाठी केंद्र सरकार नवीन नियम बनवणार आहे. येत्या काही दिवसांत विजेच्या दरात बदल होणार आहेत. दिवसभरात विजेचे दर 20 टक्क्यांनी कमी होतील. रात्रीच्या वेळी विजेचे दर 20 टक्क्यांनी वाढतील, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
सकाळी आणि संध्याकाळी विजेचा वापर जास्त असतो. या वेळेत केलेली कामे दिवसभरात केली तर वीज बिलात 20 टक्के बचत होऊ शकते. ऊर्जा मंत्रालय नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. नवीन नियमांनुसार दिवसा वीज 20 टक्के स्वस्त होणार आहे. पीक अवर्समध्ये विजेचे दर 20 टक्के जास्त असतील.
एप्रिल 2014 पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवे नियम लागू होतील. त्यानंतर एका वर्षाने कृषी क्षेत्राला सोडून बहुतांश ग्राहकांसाठी नियम लागू होतील.