एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 14 मेसेंजर मोबाईल ऍप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी या मेसेंजर मोबाईल ऍप्लिकेशन्सद्वारे गुप्त संदेश पाठवत असत. काश्मीरमधील त्यांचे समर्थक आणि ऑन-ग्राउंड कामगार (OGWs) यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहशतवादी या अॅप्सचा वापर करत होते.
या अॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi, Threema यांचा समावेश आहे.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅप्सच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये उपस्थित दहशतवाद्यांना कोडेड मेसेजही पाठवले जात होते.
गेल्या काही वर्षांपासून सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे संपर्क नेटवर्क रोखण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लॉक केलेल्या अॅप्सचे सर्व्हर वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. अॅप्समध्ये मोठ्या प्रमाणात एन्क्रिप्शन आढळल्यामुळे या अॅप्समध्ये अडथळा आणण्याचा कोणताही मार्ग नाही.