प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मैकमिलन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

WhatsApp Group

प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका स्पॉन्सरने दिली आहे.

अमेरिकेत राहणारे सेड्रिक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर होते. 2017 मध्ये अरनॉल्ड क्लासिक बॉडीबिल्डिंगचे शीर्षक जिंकून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉडीबिल्डर मॅकमिलनला ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांना एक-दोनदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by BLACKSKULL USA (@blackskullusa)

मॅकमिलन स्पॉन्सर करणाऱ्या एक कंपनीने (Black Skull USA) बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.