CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

WhatsApp Group

नवी दिल्ली –  हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय वायुसेनेने केली आहे. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासंह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांचं निधन झालं आहे. ज्या रशियन बनावटीच्या Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात रावत यांचे निधन झाले ते हेलिकॉप्टर सर्वात सुरक्षित समजले जाते. त्यामुळे हा अपघातच आहे की घातपात याबाबतही प्रश्वचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

बिपिन रावत यांच्या या आकस्मिक आणि दुःखद निधनाने पूर्ण देशात खूप हळहळ व्यक्त केली जाता. या घटनेमुळे आपल्या संरक्षण दलांचे आणि भारत देशाचे मोठे नुकसान झाले आहे. रावत देशाचे पहिले सीडीएस होते. देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय साध्यण्याचे मुख्य काम रावत करत होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी CDS बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या दुर्देवी अपघातामुळे देशातील लहानपासून ते थोरापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळले होते. गेली अनेक वर्ष भारतीय सैन्यात वेगवगळी पदे भुषवणारे बिपिन रावत यांच्या जाण्याने भारताची मोठी हानी झाली आहे.

अनेक वर्ष भारतीय सैन्यात राहून देशाची सेवा केल्यानंतर बिपिन रावत यांना CDS बनवण्यात आले होते. रावत यांना भारताचे पहिले CDS होण्याचा मोठा बहुमान मिळाला होता. यापूर्वी ते भारताच्या थलसेनेचे अध्यक्षही राहिली आहेत. त्यांचे वडिलही भारतीय लष्कारात होते. भारतात सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेताना बिपिन रावत आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोभाल यांचा सल्ला घेतला जायचा. बिपिन रावत हे पंतप्रधान मोदी यांच्या खूप जवळचे आणि विश्वासू मानले जायचे.

जनरल बिपिन रावत हे भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुख आणि काही काळासाठी ते लष्कर उपप्रमुख देखील होते. रावत यांचा जन्म १९५८ ला उत्तराखंड गढवाल जिल्ह्यात पौरी येथे झाला. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून भारतीय सैन्याची सेवा करत आले आहे. बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंग रावत हे भारतीय लष्कारात लेफ्टनंट जनरल होते.

बिपिन रावत यांच्यानंतर CDS ची जबाबदारी कोण घेणार याकडेही पूर्ण भारताचे लक्ष असणार आहे. कारण या पदासाठी आता रावत यांच्या तोडीचाच अधिकारी  शोधावा लागणार आहे.